News

When you love what you do, it shows. And when it shows, more often than not, your work enjoys the privilege of worthy appreciation and recognition. At Vilas Javdekar Developers, our every thought, action and endeavour is guided by this very philosophy – We Love What We Do! This news section is dedicated for the achievements, activities, project launches and the moments of pride, milestones and strides that team VJ has been a part of, over the years.

चार दिवस, असंख्य स्वर… पुण्याच्या हृदयात घुमले स्वरझंकार २०२६

News

व्हायोलिन अकॅडमी यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा महोत्सव चार दिवस संगीतप्रेमींना एक अद्वितीय अनुभव देऊन गेला. दररोज सायंकाळी ५ वाजता सुरू होणाऱ्या या मैफलींनी संपूर्ण परिसर सुरेल आणि भक्तिमय वातावरणाने भारून टाकला होता. पुणेकर रसिकांसह विद्यार्थी, कुटुंबे आणि संगीत अभ्यासक मोठ्या संख्येने या महोत्सवाला उपस्थित होते. ८ जानेवारी २०२६ रोजी महोत्सवाची सुरुवात विवेक पंड्या यांच्या प्रभावी तबला सोलो सादरीकरणाने झाली. त्यानंतर आनंद भाटे, शौनक अभिषेकी आणि रघुनंदन पानशिकर यांच्या सुमधुर गायनाने श्रोत्यांची मने जिंकली. या दिवसाचे विशेष आकर्षण ठरले पद्मभूषण विश्वमोहन भट्ट आणि पंडित अतुलकुमार उपाध्ये यांचा व्हायोलिन व मोहनवीणा जुगलबंदी, ज्यांना पद्मश्री विजय घाटे यांनी तबल्यावर उत्कृष्ट साथ दिली. ९ जानेवारी २०२६ रोजी वाद्यसंगीत आणि गायन यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. शाकीर खान आणि त्यांचे शिष्य यांच्या सितार एन्सेंबल सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर कृष्णा मुसळे, निलेश परब आणि सत्यजीत प्रभू यांनी ढोलकीच्या ठेक्यांनी वातावरण भारावून टाकले. संध्याकाळी पद्मश्री मालिनी अवस्थी, पद्मभूषण साजन मिश्रा आणि स्वरांश मिश्रा यांच्या भावपूर्ण गायनाने कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. १० जानेवारी २०२६ रोजी पारंपरिक संगीतातील नाविन्यपूर्ण प्रयोग सादर करण्यात आले. ‘बंदिश रिइमॅजिन्ड’ या विशेष सादरीकरणात अंकिता जोशी, रोंकिनी गुप्ता, अरशद अली खान, कृष्णा बोंगणे आणि अमान मोहम्मद यांनी शास्त्रीय बंदिशींना आधुनिक रूप दिले. त्याचबरोबर पुर्बायन चॅटर्जी, ओजस अधिया, शिखर चंद्रकांत कुरेशी, अनय गडगिल आणि अबशार यांच्या वाद्यसंगीत सादरीकरणाने तरुण प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. ११ जानेवारी २०२६ रोजी महोत्सवाचा समारोप झाला. पद्मश्री अश्विनी देशपांडे यांच्या प्रभावी गायनाने अंतिम दिवसाची सुरुवात झाली. त्यानंतर राहुल देशपांडे आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या सुरेल गायनाने स्वरझंकार २०२६ चा सुंदर शेवट झाला. स्वरझंकार २०२६ हा केवळ संगीत महोत्सव न राहता सांस्कृतिक संवादाचे व्यासपीठ ठरला. परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल साधत या महोत्सवाने भारतीय संगीताची समृद्ध परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवली. एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या चार दिवसांच्या संगीत प्रवासाने रसिकांच्या मनावर एक अविस्मरणीय ठसा उमटवला.

News

Preparing Homeowners for Life at YashONE Eternitee

Read more ...

Charging Ahead: YashONE  Maan  Hinjawadi Leads with a Common EV Charging Station

Read more ...

VJ Brings Club ABS to Punawale, Elevating Fitness and Community Living

Read more ...

Moments That Touch the Heart, Homes That Last a Lifetime

Read more ...

Lighting the Way to Sustainable Living: Yashwin  Sukhniwas Building A & D Powers Up with Solar Success

Read more ...

Honouring House-Help Staff During Makar Sankranti across VJ Parivaar

Read more ...

YashONE Infinitee karate students amaze audiences at the Army Day celebration.

Read more ...

चार दिवस, असंख्य स्वर… पुण्याच्या हृदयात घुमले स्वरझंकार २०२६

Read more ...

Palladio Badminton Tournament 2025 and City-Level Wins Light Up the Court

Read more ...

VJ Wins Silver Award at CREDAI Pune’s Pride Best Facility Awards for Site Safety

Read more ...